रेश्मा आणि माझ्या लग्नाला ६ वर्षे होऊन गेली. १५ डिसेंबर २०१४ ला आमचे लग्न झालं. आमचं एरेंज्ड मॅरेज. अनेक तरुण तरूणींप्रमाणे आमचीही काही स्वप्न होती. अरेंज मॅरेज असल्यामुळे एकमेकांना ओळखायला वेळ लागतोच. त्यामुळे एक वर्ष त्यासाठीच द्यायचं. मग ठरलं, एक वर्ष फॅमिली प्लॅनिंग करायचं ते. एक वर्ष मस्त मौजमस्तीत गेलं. तेव्हा मी औरंगाबादला एका वृत्तपत्रात काम करत होतो. रेश्माही छोटे मोठे जॉब करत होती. तसं मी लग्न ठरल्या ठरल्या आमच्यासाठी फ्लॅट बुक केला होता. एव्हाना त्याचे हप्तेही सुरू झाले होते. तेव्हा माझा पगार थोडाच होता. तेवढ्यातही घराचे हप्ते फेडून मी रेश्मा आणि आईबाबा असं आमच्या कुटुंबाचं व्यवस्थित चालू होतं. काही कमी जास्त लागलं तर दोन मोठे भाऊ होतेच मदतीला. त्यामुळे काहीच कमी नव्हतं. लग्नाच्या दोन वर्षांनंतर बीबीसी मराठीत येतंय असं ऐकलं आणि मग त्या ठिकाणी नोकरी लागावी यासाठी प्रयत्न सुरू झाले.
सांगायचं झालं तर, मला जन्मल्यापासून कोणतीही गोष्ट सहजरित्या मिळाली नाही. खुप खटाटोप, वाट पाहाणे, तरसून तरसून प्रत्येक गोष्ट मिळाली आहे. मात्र जे पाहिजे ते मिळालंय हे नक्की.
"मुलं किती?"
इथेही तसंच झालं. बीबीसीला अप्लाय केल्यानंतर एक एक परिक्षा उत्तीर्ण होत ४ महिन्यात बीबीसीतून फोन आला की तुमचं सिलेक्शन झालंय. मग काय आमच्या आनंदाला कुठे सीमाच उरली नाही. पण यात फक्त पंचायत ही होती की, नोकरी दिल्लीला होती. पण माझी तयारी होती चांगल्या नोकरीसाठी कुठेही शिफ्ट व्हायची. त्यामुळे मनाची तयारी होतीच. जून २०१७ ला बीबीसीत मी रुजू झालो. यात आनंदाची गोष्ट म्हणजे माझी पोस्टींग दिल्लीला नसून मुंबईला झाली होती. तोपर्यंत आम्हाला अजून मुल नव्हतं. कारण पगार ही थोडा होता. त्यामुळे आम्हीही त्याकडे जास्त लक्ष दिलं नव्हतं. देवाच्याच हातात म्हणून सोडून दिलं होतं सारं. झालं तर चांगलं, नाही झालं तर काही नाही. मात्र बीबीसीत रुजू झाल्यानंतर आम्ही दोघे मुंबईत आलो. मात्र इथे आम्ही दोघेच असल्याने आता वाटायला लागलं की, आपल्याला ही मुल हवं. इतके दिवस औरंगाबादेत भावाची मुलं-मुली होते सोबत. ते माझ्या आणि रेश्माच्या फार जवळ होते, त्यामुळे तिथे काही मुलाची कमी भासली नाही. मात्र मुंबईत त्याची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. तसंच ऑफिसात, फिल्डवर बातमीसाठी कुठेही गेलो तर हा उल्लेख हमखास व्हायचा... की "मुलं किती?"
तेव्हा मग मी सांगायचो अजून झालं नाही. तर लगेचच त्या लोकांकडून फुकटचे सल्ले येण्यास सुरूवात व्हायची.
शक्यतो मुंबईमध्ये कोणीही इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत नाही. मात्र तुम्ही मुंबई बाहेर पडलात की मग हा प्रश्न एकदम सहज कानावर पडायचा.

दवाखान्यात दाखवायला सुरूवात
तसं मला त्या प्रश्नाचा काही फरक पडत नव्हता. पण जस जसे वर्ष वाढत चालले होते. तेव्हा मात्र मनात कुठेतरी वाटायचं. २०१८ पासून मग माझ्या आईनेच मनावर घेऊन रेश्माला दवाखान्यात दाखवायला सुरू केले. आता रेश्माला दाखवलं तर मी कुठे सुटतोय त्यातून. मग मलाही मनात नसताना त्या दवाखान्यांचे खेटे झिजवावे लागतं. पण मी आईला वेळोवेळी स्पष्ट सांगतचं होतो की, देवाला द्यायचं असेल तर तो देईल नाही तर नाही. उगाच तुही चिंता करू नकोस आणि आम्हालाही चिंता लावू नकोस. तेव्हा ती चिडायची. रडायची. मला कळत होतं तिचं मन.. पण काय करणार या गोष्टी हातात नसतात ना..
पैशाने ही गोष्ट विकत आणता आली असती तर दुसऱ्या मिनिटाला घरात आणली असती. पण हे तसं नाही. या ठिकाणी पैसा-अडका सर्व व्यर्थ ठरतो आणि उरतं फक्त नशीब. आता नशिबात असेल तर ते मिळेल नाही तर नाही, हे माझं मत पुर्वीपासून होतं. कारण मला मिळणारी प्रत्येक गोष्ट ही फार फार उशीरा मिळाली आहे. हे तर मला माहितचं होतं. त्यामुळे माझ्या मनात हे नक्की झालं होतं की आपल्याला अपत्यप्राप्ती काही सहजासहजी मिळणार नाही. पण मिळेल अशी खात्री होती.
परंतु एक एक उदाहरण लोकांकडून ऐकायला मिळायचे तेव्हा कधी कधी मन खचून जायचं. रेश्माला डॉक्टरांनी अनेक उपचार करायला सांगितले, काही ट्रीटमेंटही होत्या... पण मी तिला त्या करू देणार नाही हे मी पक्क ठरवलं होतं. कारण माझ्या वंशाला वारस तिचं शरीर खराब करून नको होता. जे काही होईल ते नैसर्गिकपध्दतीनेच अन्यना नाही झालं तरीही चालेल असं माझं मत होतं. पुत्रसुखासाठी लोकं काहीही करू शकतात हे डॉक्टरांना चांगलंच माहित आहे. त्यामुळे काही डॉक्टरांनी हा धंदा करून ठेवलाय (काही डॉक्टर चांगलेही आहेत. मी सर्वांना दोष देत नाही.)
"तुम्हाला कधीच मुलं होणार नाहीत"
आमच्या नात्यामधीलच एका महिलेची दोन वेळा लेप्रोस्कोपी करण्यात आली, मात्र तरीही काहीही उपयोग झाला नाही. मात्र त्या महिलेला गर्भपिशवीचा कॅन्सर झाला. परिणामी तिला अपत्यप्राप्तीशिवाय पिशवीच काढून टाकावी लागली. हे उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होतं. त्यामुळे माझा डॉक्टरांच्या उपचारांवर जास्त भरवसा नव्हता. तरीही आई आणि बायकोच्या हट्टामुळे मला हतबल व्हावंच लागत होतं. पण एक मात्र बरं होतं की, मी एखाद्या गोष्टीला नकार दिला तर त्या दोघी माझ्या शब्दाबाहेर नव्हत्या. आईने आर्युवैदिक उपचार सुरू करण्यास सांगितले. तसे आम्ही केलेही. मात्र त्याचा काही फरक जाणवला नाही. तर माझ्या मेव्हणीला पनवेलच्या एका डॉक्टरचा गुण आला होता त्यामुळे तिने आम्हाला त्या डॉक्टरची भेट घेण्यास सांगितले. आम्ही तिथे सर्व टेस्ट रिपोर्ट घेऊन गेलो. रिपोर्ट पाहून ती डॉक्चर म्हणाली की आता खूप उशीर झाला आहे. तुमची ट्रीटमेंट माझ्याकडे होणार नाही. तुम्ही ताबडतोब कुर्ल्यातील या ठिकाणी भेट द्या असं सांगत त्या डॉक्टरने आम्हाला एका IVF सेंटरचा पत्ता दिला. तसंच सांगितलं की, "जर तुम्ही लवकरात लवकर हे उपचार घेतले नाही तर तुम्हाला कधीच मुलं होणार नाहीत."

...पण १०० टक्के गॅरंटी देऊ शकत नाही
हे ऐकल्यावर आमच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आम्ही दुसऱ्याच दिवशी त्या IVF सेंटरला गेलो. तिथे पाहिलं तर एखाद्या हॉटेलला लाजवेल अशी सजावट होती. अनेक जोडपी तिथे रांगेत त्यांचा नंबर कधी येतो याची वाट पाहात होती. तर काही जोडपी त्यांच्या बाळांसोबत आली होती. हे पाहून आम्हालाही आनंद झाला. त्या दवाखान्याच्या भिंतीवर एक स्क्रीन लावण्यात आली होती आणि त्यावर त्यांच्या सेंटरमार्फत उपचार घेतल्यानंतर किती बाळांनी जन्म घेतला याची आकडेवारी होती. ही आकडेवारी काही हजारांमध्ये होती. हे पाहून माझा आत्मविश्वास वाढला. आमचा नंबर आला. तेव्हा डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या आणि काही टेस्ट बाहेरून करून आणण्यास सांगितले. तसेच ते म्हणाले जर IVF टेस्ट फेल गेली तर आपल्याला पुन्हा IVF टेस्ट करावी लागेल. जर ती सुद्धा फेल गेली तर आपल्याकडे टेस्टट्यूब बेबीचा पर्याय आहेच.. असं ती सांगत होती. पण प्रत्येक IVF टेस्टचा खर्च वेगळा. एका टेस्टसाठी किमान दीड ते दोन लाख रुपये लागणार होते. पण जर अपत्यसुख मिळणार असेल तर ही रक्कम काही जास्त नव्हती. पण मग जेव्हा मी त्यांना मुल होईल का याची १०० टक्के गॅरंटी आहे का? तर तेव्हा त्या डॉक्टरने सांगितलं की, आम्ही आमचे सर्व प्रयत्न करणार पण १०० टक्के गॅरंटी देऊ शकत नाही. ते देवाच्या हातात आहे.
शरीराची जी हानी होईल ती वेगळीच..
तिथून बाहेर आल्यावर अनेक प्रश्न डोक्यात घर करायला लागले. एवढे पैसे घालून जरी गॅरंटी नाही तर हे करायचंच कशाला. कारण आपण मध्यमवर्गीय लोकांससाठी ही रक्कम काही छोटी नाही. शिवाय रेश्माच्या शरीराची जी हानी होईल ती वेगळीच..
पण बायकोला वाटायला नको की मी पैशाकडे पाहातोय.. म्हणून मी होकार दिला. मात्र लगेचच टेस्ट करायची नाही. घरच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्यायचा ठरवलं. त्यानंतर काही दिवसांनी औरंगाबादला गेल्यावर आईला मी हे सांगितलं. माझ्या मावशीच्याच नातीनेही IVF टेस्ट केली मात्र ती फेल झाल्याचं तिनं मला सांगितलं. तेव्हा मग माझं मन पुन्हा विचलीत झालं.
मग तो उपाय आम्ही करायचा सोडून दिला. तेही वर्ष तसंच गेलं.
लग्नाच्या पाच वर्षांनंंतर...
आता २०१९ वर्षही संपत आलं होतं. लग्नाला आता पाच वर्ष पुर्ण होत होती तशी चिंताही वाढत होती. माझ्या मेव्हणीने रेश्माला एका डॉक्चरांचा पत्ता दिला. ते वजन कमी करण्याची ट्रिटमेंट सांगतात असे सांगितले. त्यांच्या उपचाराचा सकात्मक फायदा माझ्या मेव्हणीला झाला होता. तेव्हा रेश्माने त्या डॉक्टरकडे जाण्याचा हट्ट धरला. बायकोचा हट्ट मग तिकडेही जायचं ठरलं. ते डॉक्टर मिरारोडला राहात होते आणि आम्ही बदलापूरला..
सुटीचा एक दिवस काढून सकाळी लवकरच आम्ही मिरारोडला जायला निघालो. त्या डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी काही चुर्ण, काही गोळ्या आणि काही पथ्य करण्यास माझ्या पत्नीला सांगितले. त्यानंतर रेश्मासुद्धा त्या डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायांप्रमाणे डाएट फॉलो करायला लागली. तिने एका महिन्यात ६ किलो वजन कमी केले.त्यानंतर ते पथ्य पाळणं तिलाही जड जायला लागले. तिने पथ्य पाळणे सोडून दिले मात्र वजन कमी करायचा तिचा प्रयत्न सुरू होता. तोपर्यंत २०२० लागला होता. लग्नाला आता पाच वर्ष पुर्ण झाली होती. मी आता ठरवले होते की आपण एकदा का होईना आपण IVF चा पर्याय निवडायचा. भविष्यात असं नको वाटायला की, आपण हा पर्याय वापरला असता तर यश मिळाले असते.. त्यामुळे मी रेश्माच्या मनाचीही तयारी करायला लावत होतो. मात्र हा मार्चमध्ये कोरोना आला आणि सर्वकाही फिसकटलं. लॉकडाऊनमध्ये तर मी वर्क फ्रॉम होम करत होतो. त्यामुळे आम्ही दोघेही घरीच बसून होतो. खायचं, काम करायचं आणि झोपायचं हेच काम सुरू होतं. त्यामुळे वजन वाढणं सहाजिकच होतं. मार्च -एप्रिल असाच गेला. मात्र एप्रिलच्या शेवटी मला औरंगाबादला काही बातम्यांसाठी जावं लागलं तेव्हा आम्ही दोघे तिकडे गेेलो. दोन महिने माझ्या भावाच्या मुला-मुलींसोबत रेश्माने आणि मी खुप वेळ घालवला. कुटुंबासमवेत वेळ घालवला. वर्क फ्रॉम होम तिथेही सुरूच होतं. मात्र आमचा विकेंड धमाल असायचा. जुलैच्या सुरूवातीला आम्ही परत मुंबईत आलो. तितक्यात आईचा मला फोन आला की, इकडे खुल्दाबाद येथे एक बाबा आहे त्याचा अनेकांना गुण आलाय. तुम्ही परत या आणि आपण त्या बाबाला जाऊन भेटूयात.. तेव्हा मी तिला रागावलो.. हे बूवाबाजी मला पसंद नाही. मी नाही येणार.. तिनेही रागात फोन ठेवला.. दिवस असेच गेले.

त्या दोन रेषा आनंदाच्या
जसा ऑगस्ट महिना लागला तसं तसं वाटायला लागलं की, या महिन्यात आपली इच्छा पुर्ण होणार.. मी याबद्दल रेश्मालाही वेळोवेळी सांगत होतो की, मला असं वाटतंय की हा महिना आपल्यासाठी सकारात्मक असेल आणि शेवटी तसंच झालं. २४ ऑगस्टलला रेश्माने मला प्रेग्नसी किट आणायला सांगितलं. मात्र तिने जेव्हा चेक केलं तेव्हा त्यावर कसल्याल रेषा आल्या नव्हत्या. आम्हा दोघांना टेन्शन आलं. ती जेव्हा ते कीट डस्टबीनमध्ये टाकायला निघाली, तेव्हा मी तिला थांबवलं आणि ते कीट तसंच ठेवायला सांगितलं. तो दिवस निराशेचाच होता आमच्यासाठी. दुसऱ्यादिवशी माझी सकाळची शिफ्ट असल्याने मी लवकर उठलो आणि अंघोळीसाठी गेलो तेव्हा त्या किटवर अगदी फिकट अशा दोन रेषा उमटल्याचं दिसलं. मी जोरात रेश्मा असा तिला आवाज दिला. तिनेही जेव्हा ते कीट पाहिलं तर तिलासुद्धा आनंद झाला. पण मग मी त्या प्रेग्नंसी किटवरील सुचना वाचल्या तेव्हा तिथे स्पष्ट लिहिले होते की, "सिर्फ पाच मिनट के अंदर परिणाम देखे और किट को नष्ट करें.." तेव्हा मनाची धाकधूक अजूनच वाढली. दोघांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन स्पष्टपणे जाणवत होतं. मग ठरवलं की पुन्हा एकदा किट आणून चेक करायचं. मी सकाळीच मेडिकलमध्ये गेलो. पण एवढ्या सकाळी मेडिकल कुठे उघडे असतात.. तेव्हा मेडिकलच्या शोधात पुढे पुढे जात होतो. तेव्हा एक मेडिकल नुकतंच उघडलं होतं. त्याच्याकडून ते किट घेतलं आणि घरी आलो. रेश्माला पुन्हा चेक करायला सांगितलं आणि अखेर त्या किटवर दोन्ही रेषा स्पष्ट उमटल्या होत्या... तेव्हा जो आम्हाला आनंद झाला तो शब्दात न मांडता येण्यासारखा आहे.

No comments:
Post a Comment