आमचं पोट भरलं ना! बस्स... मग
मुलगा-मुलगी शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी घराबाहेर पडले की, त्याचा सर्वात मोठा प्रश्न असतो ते म्हणजे जेवण. त्यातल्या त्यात हा मुलामुलींपेक्षा त्यांच्या आईवडीलांना याची खूप मोठी चिंता असते. माझे लेकरु काय जेवत असेल. तीथे त्याला पोटभर जेवायला मिळते की नाही. चांगले जेवायला मिळते की नाही असे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यात सुरू असतात. जर त्यांचा फोन आला तर पहिले ते विचारतात जेवण केलं का, मेस चांगली आहे का.. पोटभर जेवतोस ना... एवढे प्रश्न झाल्यावर मग इतर गोष्टी सुरु होतात. हे तर झालं घरच्यांचे परंतु घराबाहेर असलेल्या मुला मुलींना सुध्दा याचे टेन्शन असतेच की, आ
ज मेस मध्ये जेवायला काय असेल, एक वेळची मेस असेल तर संध्याकाळी कुठे जेवायला जायचे, त्यातल्या त्यात मेस खराब असेल तर मुलं जेवण नीट करत नाहीत, असे असंख्य प्रश्न असतात. त्यामुळे घराबाहेर असताना जेवण मात्र चांगलं मिळाले की सर्व काही चांगल वाटायला लागतं.
ज मेस मध्ये जेवायला काय असेल, एक वेळची मेस असेल तर संध्याकाळी कुठे जेवायला जायचे, त्यातल्या त्यात मेस खराब असेल तर मुलं जेवण नीट करत नाहीत, असे असंख्य प्रश्न असतात. त्यामुळे घराबाहेर असताना जेवण मात्र चांगलं मिळाले की सर्व काही चांगल वाटायला लागतं.
माझी मेस चांगली आहे. एक आजी ही मेस चालवतात. आम्ही त्यांना माई म्हणतो. रोज गरम गरम त्या जेवायला वाढतात. दर रविवारी एखादा गोड पदार्थ असतो जेवणात. तसेच महिन्यातून कधी मधी, पावभाजी, दोसा, इडली असे बदल करुन त्या आम्हाला खूष करतात. मी आल्यापासून त्यांच्याकडेच जेवायला जातो परंतु कधीच मी मेसचे जेवतो आहे असे आतापर्यंत जाणवले नाही. त्यांच्या घरातील इतर सदस्य सुध्दा सर्व मेसचे मुले जेवल्यावर जेवण करतात. मला सागरने या मेस मध्ये नेले होते. तो इथे आल्यापासून माईंकडेच आहे. याला आता जवळपास 1 वर्ष होत आले आहे. सध्या आम्ही दोघांनी एक वेळचीच मेस लावली आहे. कारण आमच्या नोकऱ्यांच्या टाईम हा दिवसभर असतो आणि नोकरीचे ठिकाण हे मेस पासून खूप दूर आहे. त्यामुळे रात्रीचे जेवण आम्ही माईंकडे करतो आणि दूपारचे कुठेतरी बाहेर करतो. हा आमचा नेहमीचा दिनक्रमच झाला आहे. माझ्या नोकरीची शिफ्ट बदलत असल्यामुळे मी कधी दूपारी तर कधी रात्री असे एक टाईम माईंकडे जेवायला जातो. परंतु आमच्या रुममधला विवेक याची चांगलीच जेवणाची पंचायत होते. त्याच्या नोकरीचा टाईम फक्त जाण्याचा ठरलेला असतो परंतु येण्याचा टाईम फिक्स नसतो. सकाळी तो 9 वाजता जातो तर रात्री 10 तर कधी कधी 12 सुध्दा वाजतात त्याला येण्यासाठी आणि इतक्या रात्री कोणतीच मेस चालू नसते. माईंची मेस तर 10लाच बंद होते. त्यामुळे विवेकचे रोजचेच जेवणाची प्रॉबलेम असतात. दूपारचे जेवण तो ऑफिसकडे असलेल्या एखाद्या हॉटेल मध्ये करतो. रात्रीच्या जेवणाची पंचाईत होते म्हणूतो सागरला फोन करुन डब्बा आणायला सांगतो. डब्बा म्हणजे जेवणाचे पार्सल. परंतु त्याची आवडती मेस ही सुध्दा 10 वाजता बंद होते आणि तो बऱ्याच वेळा सागरला फोन करायला विसरतो. त्याला फोन करायचे आठवते तेव्हा जवळपास 10.30 वाजलेले असतात. हे त्याचे नेहमीचेच झाले.
आज सागर, गजानन, मंदार आणि मी आम्ही फिरायला गेलो होतो. रात्र तशी खूप झाली होती. फिरता फिरता सागरने आम्हाला एका पराठा सेंटरवर नेले. मी त्याला विचारले की आपण इथे का आलो आहोत तेव्हा तो म्हणाला, की अरे विवेकसाठी पार्सल घ्यायचे आहे. तीथे पराठा 20 रु पासू 35 रु. फक्त एक पराठा मिळायचा. पुण्यात सर्वच गोष्टी महाग आहेत. आणि खाण्या पिण्याच्या गोष्टी तर खूप महाग. म्हणजे तूम्ही जास्त पैसे देऊन थोडेसेच खायला मिळणार असे. विवेकचा पगार सुध्दा असा खूप काही नाही. त्याच्या या रोजच्या जेवणाचे पैसे खर्च करुन त्याला किती उरतात ते देव जाणे. परंतु त्याचा हा रोजचाच दिनक्रम आहे. कधी तो लवकर आला तर मग तो त्याच्या आवडीच्या मेस वर जेवायला जातो. परंतु असे फार क्वचीतच घडते. आणि आज हा महागडा पराठा. मी सागरला एक उपाय सुचवला की, आपण त्या चायनिज गाडीवरचे फ्राईड राईस घेऊ. तसे विवेकला भात खूप आवडतो. आणि ते फ्राईड राईस एका प्लेट मध्येच खूप येते. त्यामुळे मी सागरला फ्राईड राईसच घेण्यास सांगितले. सागरला सुध्दा हा उपाय आवडला. त्याने विवेकला फोन लावला आणि विवेकने सुध्दा होकार दिला. मग आम्ही त्या राईसचे पार्सल घेऊन घराकडे निघालो.
घराकडे निघताना पुन्हा प्रश्न पडायला लागले की, आज विवेक वर असा प्रश्न आला आणि तो नोकरीला असल्याने त्याला हे जेवण सुध्दा परवडणारे होते. परवडणारे म्हणजे तो याचा खर्च उचलू शकतो. परंतु आज या मोठ्या शहरात असे हजारो कुटूंब, मुले, मुली आहेत ज्यांना एकवेळचे जेवण मिळवण्यासाठी सुध्दा काय धडपड करावी लागते. परंतु एवढी धडपड करुन सुध्दा त्यांना मिळणारा मोबदला या महागाईचा सामना करु शकत असेल का.. का त्यांना त्यांच्या जवळ असलेल्या पैशातून दोन दिवसातून एकदाच जेवण करावं लागत असेल. कारण पुण्याची महागाई ही तर औरंगाबादच्या महागाई पेक्षा सुध्दा डबल आहे. आणि गरीबांना मिळणारा मोबदला हा जवळपास सारखाच असतो. त्यामुळे ते या ठिकाणी कसे काय जगत असतील हा विचार मला सतावू लागला. आज मोठ्या शहरात कुपोषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचे एक कारण म्हणजे ही महागाईच आहे. काय होईल या शहराचे, देशाचे आणि या देशात राहणाऱ्या गरीब जनतेचे..
प्रत्येक जण आपण व्यवस्थित आहोत ना मग जगाची चिंता कशाला करायची हाच विचार करत असतो.. तसेच काही आमचे सुध्दा झाले असावे.. आम्ही सुध्दा असेच पार्सल कधीतरी आणतो जेवतो आणि शांतपणे झोपून राहतो.. आमचं पोट भरलं ना बस्स..मग..
No comments:
Post a Comment