एक कप चहा...!
माझे संपूर्ण 17 वी (पदव्यूत्तर) पर्यंतचे शिक्षण हे माझ्या शहरात म्हणजे औरंगाबाद मध्येच झाले. त्यामूळे मला कधीच हॉस्टेलची मजा अनूभवता आली नाही. लहानपणी म्हणजे शाळेत असताना मी जेव्हा जेवणाबाबत अथवा एखाद्या वस्तू बाबत हट्ट धरायचो तेव्हा घरचे रागात म्हणायचे की, याला बोर्डींग मध्ये टाकायला पाहिजे. इथे सर्व आयतं मिळतंना म्हणून खूप नाटकं सुचतात याला. परंतु ते असेच प्रेमाने म्
हणायचे, मुळात त्यांनाच मला दूर ठेवायला आवडत नव्हते. मी कॉलेजला असताना अनेक बाहेरगावची मुले औरंगाबादला शिक्षणासाठी रहायला यायची त्यातली काही हॉस्टेलला असायची. ते नेहमी त्यांच्या रुमवरच्या हॉस्टेलवरच्या गप्पा सांगत असायचे. त्या दिवसात हॉस्टेल वरील गंमती जमती, मित्रांच्या फजिती अथवा फिरायला गेलेल्या आठवणी, कोणाचे भांडण झालेले अथवा हॉस्टेलला पाणी नसले की उडणारी धांदल अशा अनेक आठवणी ते मला सांगायचे. तेव्हा कुठेतरी मनात वाटायचं की, आपण काही तरी मिस करतोय. आपल्या अनुभवांमध्ये हॉस्टेलचा अनुभव कधी येईल का? का तो येणारच नाही. घरात कसे सर्व काही मनमुराद मिळते परंतु बाहेर असणारे माझे मित्र त्यांना प्रत्येक गोष्टीचे नियोजन करावे लागायचे. मेसची वेळ झाली की, डबे घ्यायला अथवा जेवायला, रविवार आला की कपडे धूणे, कपड्यांना इस्त्री करणे इत्यादी. तसेच एखादी कॉमन सुट्टी मिळाली की, चित्रपटाला जाणे अथवा फिरायला जाणे अशा खूप गंमती जमती ते करायचे आणि मला सांगायचे. परंतु त्यांच्या त्या गंमती- जमतीची मला फक्त ऐकून मजा माहित होती पण त्याचा अनुभव मला कधीच आला नव्हता.

ठिक आहे.. होत असत.. असं...
काल मंगळवार होता. म्हणजे माझ्या सुट्टीचा वार. मी आणि अभिषेक दोघं दिवसभर घरीच होतो. तसेच माझ्या मोबाईलचे इंटरनेट सुध्दा सुरु झाले होते, त्यामुळे बाहेर फिरायला जाण्याचा प्रश्नच येत नव्हता. दिवसभर फेसबूकवर होतो. संध्याकाळी अभिषेकला कॉलेज बॅग आणि बेल्ट घ्यायचा होता म्हणून आम्ही एफ.सी. रोडवरील मार्केट मध्ये गेलो. तेथे त्याची बॅग आणि बेल्ट घेतला तेथून पुढे त्याने मला संभाजी बागेत नेले. ही बाग थोडी प्रसिध्द आहे परंतु ती म्हणजे झेड ब्रीज सारखी... आठवलंना झेड ब्रीज.. मागील लेखामध्ये उल्लेख केलेला ब्रीज.... आठवलं का.. हा तोच.. येथे सुध्दा अनेक कपल्स असतात आणि तेच त्यांचे अश्लिल प्रकार चालू असतात. थोडा वेळ फिरलो आणि तेथून लगेच घराकडे वळालो. रात्रीचे 8.30 झाले होते. मेसला सुध्दा जायचे होते. घरी आल्याआल्या धूवायला टाकलेले कपडे धूवून घेतले आणि तोपर्यंत सागर आला होता. मग आम्ही मेसला गेलो. तेथे गजानन सुध्दा होता. गजाननने त्याच्या रुमवर माझ्या ब्लॉगबद्दल सर्वांना सांगितले होते आणि फक्त सांगितलेच नाही तर इंटरनेटवरुन सर्व ब्लॉग कॉपीकरुन त्याने त्याच्या मित्रांना वाचायला दिले होते. त्यामुळे त्यांच्या रुममध्ये मी सर्वांच्याच परिचयाचा झाललो आहे असे तो सांगत होता. जेवण करुन येताना मला माझ्या त्याची प्रचीती आलीच. कारण गजाननच्या रुममधील धीरज आमच्या वाड्याजवळ आला होता. त्याने माझ्यासोबत माझ्या ब्लॉगच्या बाबतीत बोलायला सुरुवात केली. त्याला ते खूप आवडले असे तो सांगत होता. आम्ही सगळे म्हणजे मी, सागर, धीरज, अभिषेक आणि गजानन वाड्या खाली गप्पा मारत उभे होतो. विवेक सुध्दा जेवण करुन आमच्यात सामिल झाला. आमच्या मैफिलीत तशी पावसाने सुध्दा क्षणभर हजेरी लावली होती. त्यामुळे वातावरण थोडे थंड झाले होते आणि आमची मैफिल सुध्दा गप्पांच्या रंगात होती. तितक्यात विवेकला चहा पिण्याची हुक्की आली. चहाचे नाव ऐकल्यावर मला सुध्दा आता रहावेनासे झाले. मग काय चहा पियायला जायचे ठरले... रात्रीचे 10.30 वाजले असल्याने चहाचे दूकान उघडे असणे थोडे अशक्यच होते. मग मी पर्याय शोधला तो स्वारगेट बसस्थानकाचा. तेथे चहा हमखास मिळतो. परंतु स्वारगेट दूर असल्याकारणाने सर्वांनी तेथे जाण्याचा नकार दिला आणि जवळच कुठे तरी एक चहाची हॉटेल आहे असे गजाननने सांगितले. मग काय.. आम्ही सर्वजण त्या जवळचं असलेल्या चहाच्या हॉटेलच्या शोधात निघालो. त्यावेळस आम्हाला 11. वाजले असतील. मग गजानन पुढे चालत होता आणि आम्ही सर्वजण त्याच्या मागे. गजानन हा एम. आर आहे... एम. आर. म्हणजे (मेंटली रेटार्डेड नाही बरं का!) एम. आर. म्हणजे मेडीकल रिप्रेसेंटेटीव्ह.... तो एम आर. असल्याकारणाने तो पुण्यातील त्या सदाशिव पेठेतल्या प्रत्येक गल्लीतील दवाखान्याचे, मेडीकलचे निरिक्षण करीत चालला होता प्रत्येक दवाखाना अथवा मेडीकल दिसले की तो आम्हाला काहीतरी माहिती सांगायचा.. आम्ही त्याच्या पाठीमागे चालतच होतो.. चालत चालत खूप पुढे आलो, परंतु हॉटेल काही सापडली नाही. तसेच चालत डावी कडे वळालो. तेथे सुध्दा सर्व रस्ता सामसूम होता. रस्त्याने फक्त आमचाच आवाज ऐकायला येत होता. मध्ये कोणाची टपरी चालू असली तर असली नाही तर फक्त रस्त्यावरील दिव्यांचे प्रकाश आणि आम्ही. एवढ्या रात्री धीरजला फोटो काढण्याची हुक्की आली. रस्त्यात थांबून तो पोझ देऊन मला फोटो काढायला सांगायचा. माझा मोबाईलचा दोन मेगा पिक्सलचा कॅमेरा, त्यातल्यात्यात अंधार आणि त्यातल्यात्यात धीरज मग काय.. फोटो कसा येणार यात काही वेगळे सांगायचे नको.. तरीही त्याचा हट्ट फोटो काढण्याचा. मग असेच दोन चार फोटो काढत काढत आम्ही पुढे पुढे जात होतो. हॉटेल काही दिसत नव्हते. गजानन आपला इकडे तिकडे वरती कोणी डॉक्टर, हॉस्पीटल दिसतय का पाहत चालला होता.. पुन्हा तो डावी कडे वळाला. आम्ही सुध्दा त्याच्या मागेच. नंतर वाटायला लागले की, याला हॉटेलशी काही घेणं देणं नसाव हा फक्त येथील दवाखान्यांची माहिती काढत असावा. आम्ही गजाननला विचारले अजून किती लांब आहे रे. तो म्हणाला बस इथे पूढेच कुठेतरी ती टपरी आहे. पण कशाच काय. सर्व दूकाने बंद आता 11.30 झाले होते. एकही दूकान चालू नव्हते. जे होते ते सुध्दा बंद करायच्या तयारीत होते. अजून पुढे गेल्यावर गजानन पुन्हा डावीकडे वळाला. आम्ही सुध्दा त्याच्या मागेच.. असेच डावी कडे वळत वळत आम्ही पुन्हा आमच्या वाड्याकडे आलो होतो. मग काय बसलो ओट्यावर. परंतु मला आज चहा पियायचीच होती मग मीच म्हणालो की आता गाड्या काढा आणि स्वारगेटला जाऊन चहा पिऊनच येऊ. गजानन पहिल्यांदा इतक्यादूर चालला होता. तो गाडी शिवाय कधीच फिरत नाही असे कळाले होते. तरीही मी त्याला चहासाठी फोर्स करत होतो. सागरचे मन नव्हते चहा पिण्यासाठी एवढ्या दूर जायचे परंतु सर्वांच्या इच्छेसमोर त्याने सुध्दा त्याचा विचार बदलला. मग काय.. दोन गाड्या आणि सहा मुले. एका गाडीवर तीन असे आम्ही स्वारगेटला गेलो आणि गरम गरम चहाची ऑर्डर दिली. मला बाटलीत पिण्यासा
ठी पाणी भरुन घ्यायचे म्हणून मी आणइ अभिषेक पाणी आणण्यासाठी गेलो. अभिषेकचे जेवण आज पोटभर झाले नव्हते. त्याला भूक लागली होती. म्हणून आम्ही दोन पारले बिस्कीटचे पुडे घेतले. तोपर्यंत आमचा चहा आला होता. मस्त मग रात्री 12.वाजता चहा बिस्कीटाचा बेत झाला. खूप मज्जा वाटत होती तेव्हा एक कप चहासाठी एवढ्या उठाठेव करायला. चहा घेऊन घराकडे निघालो.

माझ्या मनात कॉलेज जीवनात राहिलेली ती हॉस्टेलची सल आज पूर्ण झाल्यासारखी वाटत होती. एवढी चांगली मित्र आणि अशा धम्माल मज्जा असणाऱ्या गोष्टी. हेच तर करायचे होते मला आणि आज त्याची सुरुवात झाली होती. मागच्या रविवारचा तो मॉल आणि आज रात्रीचा हा चहा.. खरंच खूप आठवणीतील गोष्टी होत्या या दोन्ही. बस असेच मजेत दिवस जात राहिले पाहिजे एवढेच वाटत आता..
No comments:
Post a Comment