...फक्त अठरा वर्षांपूढील लोकांसाठी!
पुण्यात सर्वात जास्त मुले मुली हे शिक्षणासाठी येतात. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे नोकरीस येणाऱ्या मुलामुलींचा. आईवडील आपल्या मुलामुलींना येथे चांगले व दर्जेदार
शिक्षण मिळते म्हणून पाठवतात. अनेक पालक आपल्या मुलांना एक चांगले आयुष्य मिळावे यासाठी धडपडत असतात आणि त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. मग मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना आपल्या हृदयाच्या तुकड्याला म्हणजेच मुलगा अथावा मुलगी कोणी असो त्यांना शिक्षणासाठी दूर असलेल्या मोठ्या शहरांत पाठवावे लागते. महाराष्ट्रात तर शिक्षणासाठी पुणेच सर्वात जास्त प्रसिध्द आहे. पालकांचे आपल्या पाल्याकडून अनेक स्वप्न असतात. स्वतःच्या पोटाला मारुन अनेक पालक आपल्या दूर असलेल्या पाल्याच्या सर्व गरजा पुर्ण करण्यास धडपडत असतात. आपल्या मुलाला/मुलीला काहीच कमी पडायला नको अशी त्यांची भावना असते आणि त्यासाठी ते दिवसरात्र कष्ट घेत असतात.
शिक्षण मिळते म्हणून पाठवतात. अनेक पालक आपल्या मुलांना एक चांगले आयुष्य मिळावे यासाठी धडपडत असतात आणि त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. मग मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना आपल्या हृदयाच्या तुकड्याला म्हणजेच मुलगा अथावा मुलगी कोणी असो त्यांना शिक्षणासाठी दूर असलेल्या मोठ्या शहरांत पाठवावे लागते. महाराष्ट्रात तर शिक्षणासाठी पुणेच सर्वात जास्त प्रसिध्द आहे. पालकांचे आपल्या पाल्याकडून अनेक स्वप्न असतात. स्वतःच्या पोटाला मारुन अनेक पालक आपल्या दूर असलेल्या पाल्याच्या सर्व गरजा पुर्ण करण्यास धडपडत असतात. आपल्या मुलाला/मुलीला काहीच कमी पडायला नको अशी त्यांची भावना असते आणि त्यासाठी ते दिवसरात्र कष्ट घेत असतात.
आज मी इथे नोकरीला असल्यामुळे मी सुध्दा माझ्या आईवडीलांपासून थोडा दूरच आलो होतो. इथे आल्यापासून मला विशालचा अनेक वेळा फोन येऊन गेला. विशाल हा माझा औरंगाबादचा मित्र. मित्र काय तर लहान भावा सारखाच. तो माझ्या घरासमोर राहतो. लहानपणा पासूनची आमची ओळख. जसा सागर आणि मी तसाच मला विशाल. तो सुध्दा येथे एका कंपनीत सेफ्टी ऑफिसरचा जॉब करतो. तो माझ्या आधीपासून पुण्यात आहे. तो मला नेहमी औरंगाबादला असताना म्हणायचा की, एकदा पुण्याला येउन जा. माझ्याकडे रहायला ये! परंतु मला तेव्हा कधी ते जमले नव्हते आणि आता तर मी पुण्यातच रहायला असून सुध्दा मला ते जमत नव्हते. कारण त्याला रविवारी सुट्टी असायची आणि मला मंगळवारी. त्यातल्यात्यात त्याचे घर आणि जॉब पिंपरीमध्ये म्हणजे पुण्याच्या बाहेर त्यामुळे आमची भेट होणे जवळपास अशक्यच व्हायचे. परंतु आज संध्याकाळी मला त्याचा फोन आला. तेव्हा 8 वाजायचे होते. 8 वाजता माझे ऑफिस सुटणार असल्याने मला त्याला भेटणे शक्य होते. तो मला भेटायला बोलवत होता. तो म्हणाला की, मी जंगली महाराज रोडवर आहे, तु ये ईकडे भेटायला. मला जंगली महाराज रोड माहित होता परंतु ऑफिसकडून तेथे जाण्याचा मार्ग मला निट माहीत नसल्यामुळे मी त्याला जवळच असलेल्या झेड ब्रीजवर थांबायला सांगितले. त्याने ठिक आहे म्हणून फोन ठेवला आणि मी सुध्दा काम संपवून त्याला भेटायला निघालो.
झेडब्रीज म्हणजे पुण्याच्या कॉलेज कपल्सचा आवडते ठिकाण. तसे मी इथे आल्यापासून अनेकांनी मला झेडब्रीजचे अनेक किस्से सांगितले होते. त्यामुळे झेडब्रीजचे आकर्षण माझ्या मनात न कळत वाढत होते. दोन वेळेस झेड ब्रीजला भेट दिल्यामुळे झेड ब्रीज पहाणे झाले होते परंतु ते ही खुप रात्री. झेड ब्रीज म्हणजे पुण्यातील वाहतूकीची कोंडी होत असल्यामुळे सदाशिव पेठ मार्गे स्वारगेट कडे जाणाऱ्या रस्त्याला एक पर्याय म्हणून झेड ब्रीजचा निर्माण करण्यात आला. झेड ब्रीज हा केवळ दूचाकी वाहनांसाठी असून यात दूचाकी वाहनांना येण्या व जाण्यासाठी मार्ग आहेत. मार्गांच्या दोन्ही बाजूला पायी चालणाऱ्यांसाठी वाट असून येणाऱ्या व जाणाऱ्या रस्त्याच्या मध्ये दुभाजक (डिव्हायडर) आहे. झेड ब्रीज हा मुठा नदीवर बांधण्यात आला असून त्याचा आकार झेड सारखा असल्यामुळे त्याला झेड ब्रीज हे नाव पडले. हा त्याचा इतिहास.
मी मागे रात्री एकदा झेड ब्रीजवर गेलो होतो तेव्हा तेथे एक पोलीसाची गाडी गस्त घालताना दिसली होती. ती एकच चारचाकी सुमो त्या झेड ब्रीज वरुन जाताना दिसली होती. त्यावेळेस मला त्याचे कारण समजू शकले नाही. नाहीतरी मोठ्या शहरात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त घालतच असतात.
असो....
मी विशालला भेटायला भरभर चालत झेड ब्रीज पर्यंत पोहचलो. रस्त्यावर वाहतूक असल्यामुळे मी ब्रीजच्या पायी चालण्यासाठी असलेल्या फुटपाथ वरुन जात होतो. मध्येच काही ठिकाणची लाईट बंद असल्यामुळे तेथे काळोख होता. चालता चालता अनेक जोडपी (कपल्स) तेथे बसलेली दिसू लागली. रस्त्याच्या कडेला फुटपाथकडे तोंड करुन ही कपल्स बसलेली होती. आणि काही कपल्स फक्त बसलेली नसून काही तरी अश्लील चाळे करताना सुध्दा आढळली. इतके दिवस मित्रांकडून, इतरांकडून ऐकलेल्या गोष्टी आज पहायला मिळत होत्या. मी तसाच पुढे पुढे जात होतो. माझी नजर विशालला शोधत होती. परंतु या ठिकाणी दोन्ही बाजूच्या फुटपाथवर ही अनेक जोडपी बसलेली आढळली. प्रत्येक जण काही ना काही करत होता. कोणी गळ्यात हात घालून बसलेले होते तर कोणी काय... मला त्या फुटपाथ वरुन चालायला लाज वाटायला लागली म्हणून मी दोन्ही रस्त्यामधील दुभाजकावरुन चालू लागलो.
विशालला फोन केला व मी दिसतोय का विचारले. त्याने होकार दिला आणि ब्रीजच्या शेवटी एका कोपऱ्याला तो बसलेला दिसला. अनेक दिवसांनी झालेली भेट खरंच खुप छान होती. आम्ही दोघांनी जेवण केले. खुप गप्पा मारल्या. रात्री 10 वाजले आम्हाला निघायला. त्याने गाडी आणल्यामुळे तो गाडी घेऊऩ निघून गेला परंतु मी पायीच होतो. मी घराच्या रस्त्याने वळालो. घराकडे जात असताना मागे असलेल्या झेड ब्रीजकडे पुन्हा एकदा नजर फिरवीली आणि मनात अनेक प्रश्नांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. वाटायला लागले की, आईवडीलांनी आपल्या मुलीला/मुलाला इथे इतक्या लांब शिकायला पाठवले होते हे विसरलेत का ही मुलं. आपण काय करतोय याचे थोडे सुध्दा भान नाही का त्यांना. इतक्या विश्वासाने मुला मुलींना इतक्या दूर ठेवणाऱ्या पालकांना जेव्हा हे कळेल की माझा मुलगा/मुलगी रस्त्यावर असी कामं करतात तेव्हा त्यांना काय वाटेल. स्वातंत्र दिले म्हणजे ते असे वापरावे का.. ठिक आहे मी मान्य करतो की हे वय असचं असतं, या वयात हे होतचं असत. परंतु ही अशी लाज सोडून रस्त्यावर करण्यापर्यंतची मजल जाणे म्हणजे काय.. तुमच्या भावना तुम्हाला आवरता येत नसतील तर पटकन लग्न करुन मोकळे व्हा. हे काय सार्वजनिक ठिकाणाचा गैरवापर करत आहेत. इतरांना त्या फुटपाथवरुन चालत जाण्याची लाज वाटेल इतकी कशी लाज सोडून वागतात ही मुलं.
ज्या उद्देशाने हा ब्रीज बांधण्यात आला तेव्हा त्या बांधणाऱ्या इंजीनीअरने सुध्दा अशी कधी कल्पना केली ऩसेल की, या पुलाचा असा सुध्दा वापर केला जाऊ शकेल. ते फुटपाथ बनवण्या मागचे कारण हे होते की, पायी जाणाऱ्यांना या दुचाकींचा त्रास होऊ नये परंतु इथे तर दुचाकीचा त्रास होणे दूर तर त्या जोडप्यांचा त्रास नागरीकांना होत आहे. मला तर वाटते वयस्कर लोक आवर्जून हा रस्ता टाळत असतील. हे जर असच चालू राहीले तर पुढे काही दिवसांनी या ब्रीजच्या दोन्ही बाजूस एक पाटी लावावी लागेल... ती म्हणजे फक्त अठरा वर्षांपूढील लोकांसाठी....
खरंच लोक कशाचा कसा फायदा घेतील काहीच सांगता येत नाही...

superb thought and writing Rahul! congrats!!
ReplyDeleteKharach jar swatantrya milal tar tyacha swairachar nahi karayala pahije....
Aso aaplya hya mitrana kalel tevha kadachit khup ushir zalela asel....
God bless them ( changali buddhi devo )...