सॅंडविच
पुण्यात माझी एक आत्या राहते. मला माहित नव्हते इतके दिवस, परंतु दोन वर्षांपूर्वी त्या आमच्या घरी आल्या होत्या औरंगाबादला. तेव्हा कळाले की त्या पुण्यात सुध्दा आमचे नातेवाईक आहेत हे. आईवडील वारीला आले होते तेव्हा आत्या आणि मामा आईवडीलांना भेटायला आले होते. त्याच वेळेस मी ऑफिसात कामावर असल्यामुळे माझी त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यांनी मला फोनवर घरचा पत्ता सांगितला होता. वेळ मिळालीतर भेटायला ये असे ते म्हणाले. आज माझ्या कामाची वेळ सुध्दा संध्याकाळी 5 ते रात्री 1 ची असल्यामुळे मी पूर्ण दिवस घरातच राहणार होतो, त्यामुळे मी सकाळीच आत्यांच्या घराकडे जायचे ठरविले. सकाळी मामांना फोन केला आणि मी तुमच्या घरी येत आहे असे सांगितले. त्यांचे घर मंडईच्या पुढे शुक्रवारपेठेत होते. माझ्या घरापासून ते अंतर जरा दूरच होते. मी रस्ता शोधत शोधत त्यांच्या घरापर्यंत पोहचलो. त्या निमित्ताने पुणा थोडे थोडे ओळखीचे होत होते एवढ मात्र खरं. जवळपास अर्ध्यातासानंतर मला त्यांचे
घर सापडले. दार थोडे उघडे होते. दारासमोर उभा होतो तेच आत्याने मला दाराच्या फटीतून पाहिले आणि पटकन दार उघडले. मामा घरातच होते. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या. कुठे राहतोस, काय करतोस, शिक्षण काय झाले इत्यादी सर्व माहिती मामांनी विचारली. मामाची माझी ही पहिलीच भेट होती. कारण त्यांचे आमचे कधीच काही संबंध आले नव्हते. आज कामाच्या निमित्ताने मी पुण्याला आलो आणि ते सुध्दा पुण्यात असल्याकारणाने ही भेट होती. बोलणे चालूच होते तो पर्यंत आत्यांनी शिरा करुन आणला. छान होता शिरा. आवडला मला. आत्या औरंगाबादला आल्या होत्या तेव्हा त्यांच्या सोबत त्यांची मुलगी म्हणजे माझी ताई होती. ती आज दिसत नव्हती. नंतर थोड्यावेळाने ती सुध्दा आली. मग ती मला विचारत होती की, पुण्याचा काही अनुभव आला की नाही, मी नेहमी प्रमाणे चांगलाच अनुभव सांगितला. वाईट सांगू पण कसा शकेन कारण ते स्वतःच पुण्याचे रहवाशी आहेत. त्यामुळे मी चांगल्यावरच भर देत होतो. परंतु नंतर तीनेच इथला लोकांच्या मानसिकतेबद्दल विषय काढल्यावर मी सुध्दा थोडा खुललो. माझ्या मनात मी जे दाबून ठेवायचा प्रयत्न करत होतो त्याला आता वाट मिळाली होती. मी बोलता झालो. सांगितले तीला मला आलेले अनुभव. केक विकणाऱ्या दुकानदाराचा अनुभव, घरमालकीन आजीचा अनुभव इथले रिक्षावाले तसेच इतर दुकानदार. ती सुध्दा खुषच झाले माझे अनुभव ऐकून. कदाचित तीचे मत आणि माझे मत जुळले असावे. आत्या आणि मामा सुध्दा तेथेच होते ऐकत होते सर्व. मामांना सुध्दा असे अनुभव आलेत परंतु ते जास्त नाहीत. कारण ते सुरुवाती पासून येथेच कामाला असल्यामुळे त्यांना त्या लोकांत फारसा जास्त बदल जाणवत नसावा. परंतु जे बाहेरुन आलेत त्यांना हा बदल लगेच दिसतो. खुप वेळ बोलण चालू होत. नंतर मी जाण्याचे ठरवले. आत्यांनी मला मंगळवारी सुट्टच्या दिवशी (त्यांना माझा सुट्टीचा वार कळाला होता..) जेवायला बोलावले. मी येतो म्हणून सांगितले आणि त्यांचा निरोप घेऊन निघालो ऑफिसच्या वाटेवर.

ऑफिस जरी 5 वाजताचे होते तरीही मी लवकरच गेलो होतो ऑफिसात. माझ्या बॅंकेचे अकाऊंट काढायचे होते. आज पासबूक मिळाले होते. ते घेऊन ऑफिसात गेलो. वेळ होता बराच मग अनेक छोटी मोठी काम करत बसलो. मी दू 3. वा पोहचलो होतो. त्यामुळे मला अजून दोन तास काहीतरी करावे लागणार होते. मी पी.सी.वर ब्लॉग लिहीत बसलो तसेच एक फोटो फिचर तयार केले. हे फोटो फिचर तसे नामंजूर करण्यात आले परंतु त्याचा मी आता ब्लॉग बनवणार होतो. त्याचीच तयारी करायला लागलो. घरी जायला खूप रात्र होणार होती म्हमून सागरला मेस मधून डब्बा आणायला सांगितला परंतु मेस मध्ये डब्बा नाही असे त्याने फोन करुन सांगितले. माझी संध्याकाळची पंचाईत होणार होती हे नक्की झाले होते. कारण मध्यरात्री कोणतेच दुकान उघडे नसते. तरीही मी काम करत राहिलो. आज जेवणाला सुट्टी तर सुट्टी हा निर्णय मी घेऊन टाकला होता. मध्य रात्री काम संपवून मी घराकडे निघालो. रस्त्यावर माझ्या सोबत प्रत्येक गल्लीत काही कुत्रे, दारू पिलेले लोक, आणि फुटपाथवर झोपणारे भिकारी असे दिसत होते. अधून मधून एखाद –दोन वाहने जायची. तेवढाच काय तो त्यांचा आवाज नंतर पुऩ्हा निरव शांतता. घराकडे जाताना एका गल्लीतून जावे लागते. त्या गल्लीत मी आलो तर तिथे थोडी वर्दळ होती. एक दोन दूकाने उघडी दिसली. काही बेकरीची दुकान होती आणि काही आईस्क्रीमची. पण मी जेवायचे नाही असे ठरवल्यामुळे मी घराकडे निघालो. शेवटी मला कुणीतरी आवाज दिला. मी निट पाहिले तर विवेक होता तो. तो ही अत्ताच आला होता ऑफिसवरुन. त्याला जेवलास का विचारले त्याने मला एका दुकानातून सॅंडविच खाल्याचे सांगितले. दुकान जवळच होते आणे उघडे सुध्दा होते त्यामुळे मी सुध्दा आज सॅंडविच खाऊनच झोपायचे ठरवले. दोन सॅंडविच खाल्ले. थोडं पोट भरल्यासारखे झाले आणि मग आम्ही दोघे घराकडे निघालो झोपायला. आणि पुन्हा उद्या उठून ऑफिसला जायला...
No comments:
Post a Comment