Thursday, June 16, 2011

पहिला दिवस (15 June 2011)

पहिला दिवस
अनेक मूलं पूण्याला नोकरीच्या शोधात येतात. खूपसारी स्वप्न, आकांक्षा, अपेक्षा मनात बाळगून घराचा निरोप घेऊन आज गावातील, छोट्या शहरातील मुले आज मोठ्या शहरांत येतात आणि त्या शहाराच्या गर्दीत हरवून जातात. त्यातलाच मी एक, पण हरवून जाणा-यातला नाही. माझे शहर तसे मोठेच औरंगाबाद. ईसकाळला नोकरी लागली आणि बॅग भरुन सरळ आलो पूण्याला. पूण्यात पाय ठेवताच येथील पावसाळी थंडीने माझे स्वागत केले. महाराष्ट्र शासनाच्या बसची आणि ड्रायव्हरची कृपाच म्हणावी कारण त्याने मला फक्त ४.३० तासात पूण्याला आणले. मी पूण्याच्या शिवाजीनगर बसस्थानकावर सुमारे ३.३० ला उतरलो. मित्राला फोन लावला आणि तो घ्यायला आला. बस मधून येताना अनेक नवीन विचार, नवीन कल्पना, नव्या युक्त्या माझ्या डोक्यात गोंधळ घालत होत्या परंतु आता बस मधून उतरल्यावर काय माहित त्यांना काय झालं ते.. सर्व गायबच झाल्या. मित्राच्या रुम वर पोहचलो. त्याची रुम म्हणजे एका जून्या वाड्यातली एक खोली. याच वाड्यातल्या दूस-या एका खोलीवर माझे सूध्दा नाव कोरण्यात आले आहे. म्हणजे मी सुध्दा इथेच एक खोली घेऊन राहणार आहे. सकाळी आवरुन जॉबला निघालो. आज पहिला दिवस आणि माझ्या पहिल्या वहिल्या पूण्याच्या नाश्त्याची वेळ. हॉटेल वर गेलो तर तिथे पोह्याची ऑर्डर दिली पण मिळाला उपमा.. म्हणजे पोहे नव्हते तिथे. नाश्ता करुन सकाळच्या ऑफिसला मित्राने सोडले. ऑफिसात गेल्यावर असं जाणवलं की मीच पहिला व्यक्ती होतो तिथे आलेला. मग थोड्या वेळाने एक एक जण येत गेले. माझ्या जॉईनिंगचे सर्व फॉर्म आज भरायचे होते. तेवढे सर्व काम उरकून मी माझ्या ईसकाळच्या विभागात गेलो. तिथे अवधूत नावाचा कलिग भेटला. त्याने आवश्यक तेवढी माहिती दिली ईसकाळ बाबत आणि नंतर थोड करत बसलो. सुरुवातीला थोड कंटाळवाणं वाटलं तरी आजचा दिवस मात्र छानच गेला. नंतर रुम कडे परतीचा प्रवास सुरु झाला. मित्राने जाताना सोडलं असल्यामुळे मला ते फार जवळ वाटत होतं पण येताना सर्व हकीकत समोर आली. हा रस्ता सोलापूर पेक्षा जास्त किचकट वाटायला लागला होता मला. मी कोणत्या एरीयात राहतो याचे फक्त नाव माहित होते परंतु नेमका पत्ता माहित नव्हता. याला विचार त्याला विचार असं करत करत शेवटी रुमवर पोहचलो. येई पर्यंत माझ्या शर्टाने मात्र अंघोळ केली होती. मी सुध्दा थकलेलो. कसं बसं घर सापडलं हेच नशीब म्हणटलं आणि आराम करत बसलो. मग एक एक मित्रांचे फोन येत होते की, पहिला दिवस कसा गेला... त्या मित्रांसाठीच हा ब्लॉग लिहिला आहे.... I miss u Friends....

2 comments: