Monday, June 20, 2011

कुठेतरी कोणीतरी (19 June 2011)

कुठेतरी कोणीतरी
पुणे म्हटलं की अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. शनिवार वाडा, पुणा विद्यापीठ, सिंहगड, अजून अनेक गोष्टी असतील. परंतु या सर्वात महत्वाची एक गोष्ट म्हणजे दगडूशेठ हलवाईचा गणपती. हा गणपती म्हणजे पुण्याचा मान. पुण्याची ओळख. पुण्याचे सर्वकाही. पुण्यात आलेल्या प्रत्येकाला वाटतं की आपण एकदातरी दगडूशेठला जाऊन यावं. त्यांच दर्शन घ्यावं. गणेश उत्सवाच्या वेळेस तर काय मान असतो या गणपतीला. पुण्यात गणेश उत्सवादरम्यान दोनचं गणपती महत्वाचे असतात. पहिला म्हणजे कसबापेठचा गणपती आणि दूसरा म्हणजे दगडूशेठ. असो.. मी काय तुम्हाला माझी रोजनिशी सोडून ह्या गोष्टी सांगतोय.
बरं आज १९ – ६ - २०११ रविवार..
रविवार म्हणजे कसं प्रत्येकाला एक आनंदाचा दिवस असतो. प्रत्येक जण यादिवसाची वाट पहात असतो. माझे सर्व रुम मेटस् रविवारचे वेगवेगळे प्लान काल ठरवत होते. पण मला त्यांच्यात सहभाग घेता येत नव्हता. कारण पत्रकारीतेचा जॉब म्हणजे सुट्टीचा काहीच नेम नाही. मला तर या रविवारचा काहीच उपयोग नव्हता . कारण माझा जॉब संध्याकाळी ५ ते रात्री १ होता. परंतु रुम वर येण्यासाठी खूप रात्र होणार होती म्हणून मी दु. ३ ते रात्री ११वा. जाणार होतो. रविवार असल्याने सर्वजण उशीरा झोपले. काल आम्हाला झोपायला तर रात्रीचे २ वाजले होते. म्हणून सकाळी उठायलासुध्दा उशीर होणार हे नक्की झाले होते. माझी सकाळ ११ वा. झाली. उठल्यावर कळाले की माझे सर्व रुममेटस् नाश्ता करायला गेले. मी पटकन अंघोळ करुन आवरले आणि नाश्त्यासाठी गेलो.
रविवार असल्याने माझी मेस सुध्दा आज एकवेळच असते. म्हणून दूपारी जेवण करुनच कामाला गेलो. सागरचे काही तरी काम होते म्हणून तो मला सोडायला आला होता. पहिले शिवाजीनगरला त्याचे काम केले आणि तो मग ऑफिसकडे सोडून निघून गेला. . वा ऑफिसला पोहचलो. पुन्हा तेच ट्रान्सलेशनचे काम होते. पण त्याबरोबर मला काही सेक्शनला वेबसाईटवर बातम्या अपडेट करायच्या होत्या. माझ्याकडे आज मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ हे विभाग देण्यात आले होते. याचे काम फक्त एवढेच असते की, महाराष्ट्रभरच्या पत्रकारांनी पाठवलेल्या बातम्या चेक करुन आवश्यक असलेल्या बातम्या वेबसाईटवर अपडेट करायच्या. हे काम मी कालच शिकून घेतल्यामुळे मला आज काही अवघड वाटत नव्हतं रात्री ११ वाजेपर्यंत हेच काम चालू होतं. रात्री ११ ला माझा सागरचा फोन आला. त्याने सांगितले की, मी तुझ्या ऑफिसच्या जवळच आहे. मी त्याला विचारले की, ‘नेमके कुठे?’
तो म्हणाला, ‘मी दगडूशेठ गणपती समोर उभा आहे तू तीथेच ये ’.
मी त्याला थांबायला. माझे काम मी पटकन संपवले आणि त्याला भेटायला निघालो. मी तिथे पोहचे पर्यंत तर मी त्यालाच भेटायला निघालो होतो. रात्रीचे ११.०० वाजल्याने रस्त्यावर कोणीच नव्हते फक्त कुत्रांशिवाय. परंतु जस-जसे मंदीर जवळ येत होते तशी लोकांची गजबज ऐकायला येत होती. काही तुरळक गाड्या बसेस चालू होत्या पण त्यांचे प्रमाण काही जास्त नव्हते. मी मंदीराच्या जस-जसे जवळ पोहचत होतो तस-तशी मंदीराची रोशनाई मला थोडी जास्तच आकर्षित करु लागली होती. मी मंदीरा समोर पोहचलो. तिथे खूप गर्दी दिसली. बाहेरुनचं दगडूशेठांचं दर्शन झालं. त्यांचे ते प्रसन्न रुप पाहून मला फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. मी एक- दोन फोटो काढले. त्यावेळेस माझ्या कडे मोबाईल कॅमेरा सोडून काहीच नव्हते. त्यामुळे मला जास्त चांगले फोटो घेता आले नाही. परंतु मोबाईल कॅमेरा तरी होता माझ्याकडे यामुळे मी जरा आनंदीच होतो. एक मुर्तीचा आणि २-३ मंदीराचे फोटो घेतल्यावर एकदम आठवले की आपण इथे फोटो काढायला अथवा दर्शनाला आलेलो नाहीत तर इथे सागर उभा आहे त्याला भेटायला आलोय. लगेच मोबाईल खिशात टाकून मी त्याला शोधू लागलो. मंदीराच्या समोरील रस्त्याच्या पलीकडे तो एकटाच माझी वाट पहात होता. त्याला जाऊन भेटलो. त्याने सांगितले की आज संकट चतूर्थी आहे. तेव्हा माझे दिवे पेटले की, ही गर्दी एवढी का आहे आज !
तो आणि मी दर चतूर्थीला आमच्या औरंगाबाद येथील काळा गणपती म्हणून प्रसिध्द असलेल्या गणपतीच्या दर्शनाला जात होतो. परंतु तो पुण्याला आल्यापासून आमचा तो नियम तुटला होता. परंतु आज जणू काही दगडूशेठांच्याच कृपेने तो योग पुन्हा जूळून आला होता...
त्यावेळेस वाटलं की, ‘‘आपण जे काही बघतो आहे.. कदाचित हे पहिलेच लिहून ठेवलेल असेल... कुठेतरी कोणीतरी’’..

No comments:

Post a Comment