Friday, June 17, 2011

दहावीचा निकाल (17 June 2011)

दहावीचा निकाल

आज माझी सकाळ जरा उशीराच झाली. कारण माझा ऑफिसचा टाईम दूपारी १ ते रात्री ९ होता. सकाळी १० ला उठलो सर्व आवरुन नाश्ता करुन ऑफिस साठी निघालो. आज ऑफिससाठी नवीन रस्त्याच्या शोधात होतो. तो रस्ता सापडल्या सारखा वाटत होता. नवीन रस्त्याने निघालो. पण नंतर कळाले की हा रस्ता काल मी आलेल्या रस्त्यापेक्षा वेगळा आहे. तरी पण चालत राहिलो. जवळ पास ४-५ किमी चालल्यानंतर कळाले की आपला रस्ता जरी कालचा नसला तरी हा बरोबरच आहे.
ऑफिसला १.०० वाजता पोहचलो. आज मला भाषांतराचेच काम होते. एक एक बातमी भाषांतरीत करुन वेबसाईटवर अपलोड करत होतो. दहावीचा निकाल लागल्याने सर्वीकडे निकालाचीच चर्चा होती. तितक्यात एक फोन आला. मला बातमी घ्यावयास सांगितली. फोनवरुन वार्ताहर मला माहिती देत होता आणि मी ती टाईप करत होतो. बातमी ऐकताच थोडा धक्का बसला कारण बातमी होती ती १२ वर्षीय मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची. बातमी टाईप करताना नाही नाही ते विचार डोक्यात घर करायला लागले. परंतु नंतर लगेच भानावर आलो. कारण मी जरी टाईप करत होतो परंतु जो वार्ताहर मला ही माहिती सांगत होता तो एकदम शांतपणे मला बातमी सांगत होता. तेव्हा वाटले की काम माणसाला किती दगडा सारखे बनवते. कोणाला काहीच वाटत नाही. माहित नाही हे बरोबर आहे की चूक.. पण हेच सत्य आहे. घटना घडून गेली आणि तीला आता बातमीचे स्वरुप आले होते. ही बातमी मी टाईप केली आणी वेबसाईटवर पोस्ट केली.
नंतर एक एक बातमी अपडेट करत करत संध्याकाळ झाली. नवीन काम समजून घ्यायचं होत. त्यामुळे एक एक काम सोबत काम करणा-या मित्रांना विचारत विचारत करत होतो. एक दोन बातम्या चुकल्या परंतु समजले काम कसे करायचे ते.
इंटरनेट असल्यामुळे नेहमी ऑनलाईन कोणी ना कोणी भेटत असतं. फेसबुकवर, जीमेल वर भेटतात मित्र, बोलतात, चॅटींग करतात त्यामुळे थोडं बरं वाटतं. असं वाटत की मी घरीच आहे. परंतु लगेच कोणी तरी मला म्हणाले की ही न्यूज ट्रान्सलेट करुन अपडेट कर तेव्हा लगेच मन ठिकाण्यावर येत की, मी पुण्यात आहे ऑफिस मध्ये......

No comments:

Post a Comment