Thursday, June 16, 2011

पावसाळी दिवस (16 June 2011)

पावसाळी दिवस

आज पासून माझ्या कामाची वेळ बदलला होती. दुपारी २ ते रात्री १० हा वेळ करण्यात आला होता. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने सर्व दृष्य थोडं मनोहारीच होत. अशातच मला लवकर उठायच नसताना माझ्या रुममेट्सच्या आवाजाने माझी सकाळ ८ वाजताच झाली. मग नाश्ता करायला जायचं म्हणून जरा लवकरच तयार झालो. नाश्ता करुन आल्यावर बोअर होत होतं म्हणून माझ्या लॅपटॉपवर मुव्ही बघायला लागलो.
मी ज्या ठिकाणी राहतो त्या घराची मालकीण एक आजी आहे. त्या आजीच्या बाबतीत खूप ऐकलं होत पहिले परंतु आल्यावर त्यांच दर्शन झालं आणि त्यांच्या बाबत ऐकलेल्या अनेक गोष्टींपैकी एकाचा मला आज प्रत्यय आला. झालं असं की मी लॅपटॉप लावला होता आणि मुव्ही बघत होतो. तितक्यात त्या आजी आल्या त्यांच्या कडे रहायचं असेल तर लॅपटॉप आणायचा नाही आणि जर वापरण अत्यावश्यक असेल तर त्यांना त्याचे १०० रु. अतिरिक्त द्यावे लागतात असे मित्रांनी पहिलेच सांगितले होते. परंतु मी त्यांना सांगितले नव्हते की, माझ्याकडे लॅपटॉप आहे हे. शेवटी त्यांनी माझा लॅपटॉप पाहिला थोड्या आणि चिडल्या त्या काही म्हणण्यापूर्वीच त्यांच्या हातात १०० रु. टेकवले आणि त्यांना शांत केले. नाही तर जवळ पास १ तास त्यांची बडबड चालूच राहिली असती.
दूपारचे १२ वाजले होते. मी माझ्या जॉबला निघालो होतो. ढगाळ वातावरण त्यात मला पावसाची आवड त्यामुळे आजचा दिवस जरा जास्तचं आवडीचा होता. परंतु ही आवड थोड्याच वेळात पूर्ण झाली. पाऊस येईल यामुळे मी बॅगमध्ये जरकिन घेऊनच निघालो होतो. परंतु काल सांगितल्या प्रमाणे माझ्या जॉबचे ठिकाण हे घरापासून चांगलेच दूर आहे. रस्त्यात पावसाने हजेरी लावली. गडबडीत जरकीन घालून घेतले आणि पून्हा प्रवास सूरु झाला. परंतु चालणं, अंगावर जरकीन, आणि पाठिवर बॅग असे सर्व सूत्र जूळल्याने माझी रस्त्यात दोन्ही बाजूने अंघोळ झाली. बाहेरून पावसाने आणि आतून घामाने. परत थोड्यावेळाने पाऊस गेल्यावर जरकीन काढून पून्हा बॅग मध्ये टाकले. आणि ऑफिसला पोहचलो. वेळ जरी २ वा. ची असली तरी मी १.०० वा. पोहचलो होतो. कॅन्टीन मध्ये दूपारचे जेवण करुन ऑफिसात गेलो आणि कामाला लागलो. पहिल्या दिवशीचा ब्लॉग अपडेट केला आणि काम सूरु केले. घरचे, मित्रांचे फोन चालूच होते. एक एक मित्रांना उत्तर देत देत आजचा दिवस सुध्दा संपला. आज रात्री १०.०० वा. घरी जावे लागेल म्हणून मित्राला मेसचा डबा आणायला सांगितला होता. आता हा ब्लॉग लिहून मी घराकडे निघणार आहे.

No comments:

Post a Comment